Ad will apear here
Next
पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे यांचे युरोपातील आइस स्केटिंग स्पर्धेत यश
ओम मुरकुटे

पुणे : इंटरनॅशनल स्केटिंग युनियनतर्फे युरोपातील बेलारूस येथे घेण्यात आलेल्या आइस स्केटिंग स्पर्धेत पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे या दोघांनी यशस्वी कामगिरी केली. पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पाचशे, हजार आणि पंधराशे मीटर स्केटिंगचे टप्पे यशस्वीपणे पार करत ओमने बेलारूस करंडक पटकावला. १९ वर्षांखालील गटात स्वराली देवने करंडक जिंकला.

या स्पर्धेत भारतासह अमेरिका, रशिया आणि बेलारूस या देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या आधी पंधरा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यातील कामगिरीच्या आधारे बेलारूस कपसाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली. तेरा, पंधरा, एकोणीस वर्षांखालील आणि एकोणीस वर्षांच्या पुढील अशा चार गटात ही स्पर्धा झाली. पंधरा वर्षांखालील स्पर्धकांच्या गटाचे प्रतिनिधित्व ओम मुरकुटे याने केले. ओम बाणेरमधील डी. ए. व्ही पब्लिक स्कूलमध्ये नववीत शिकत आहे. 



स्वराली देवने या स्पर्धेत एकोणीस वर्षे वयोगटाखालील स्पर्धकांच्या सहा मुलींच्या गटाचे प्रतिनिधित्व केले आणि बेलारूस करंडक जिंकला. आठव्या वर्षापासून स्वरालीने आइस स्केटिंगची आवड जोपासली आहे. तिने सलग तीन वर्षे राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच एशियन शॉर्ट ट्रॅक स्पीड आइस स्केटिंगमध्ये कास्यपदक मिळवले आहे. तिने फिलिपिन्स शॉर्ट ट्रेक आइस स्केटिंग ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक, तर सिंगापूर ओपन आइस स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळवले आहे. तसेच तिने तुर्की, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, बेलारूस, बल्गेरिया या सात देशांत आइस स्केटिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

स्केटिंग स्पर्धेसाठी स्वराली देव आणि ओम मुरकुटे यांना भारताचे पहिले आइस स्केटिंग खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अवधूत तावडे यांनी मार्गदर्शन केले. भारतात आइस रिंक उपलब्ध नसल्याने ओम प्रशिक्षक सुबोध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोलर स्केटिंग रिंकवरच आइस स्केटिंगचा सराव करत आहे. या पार्श्वभूमीवर त्याने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. 

‘स्केटिंग हा माझा छंद आहे; पण या खेळासाठी वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याने अधिक प्रयत्न करण्याची शक्ती मिळते,’ अशी भावना ओमने व्यक्त केली. या खेळाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत स्वरालीने व्यक्त केले. स्वराली पाषाणला राहत असून, सिम्बायोसिस संस्थेत बारावीत शिकत आहे. घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळेच उत्तुंग कामगिरी करणे शक्य झाल्याचे ती म्हणाली. मुंबईला एस्सेल वर्ल्डच्या रिंकवर आणि मग दिल्लीच्या रिंकवर तिने सराव केला होता. 

(या दोन्ही खेळाडूंचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZZBCG
Similar Posts
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी विजेती पुणे : अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा बुद्धिबळ  संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २३३ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली
रितू छाब्रिया यांना ‘एशियन बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ प्रदान पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांना नुकत्याच दुबई येथे झालेल्या सोहळ्यात ‘एशिया बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
डॉ. पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्कार पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उमेश झिरपे यांची ‘माउंट मेरा’ शिखरावर यशस्वी चढाई पुणे : गिरिप्रेमी या प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेच्या प्रमुख मोहिमांचे नेते उमेश झिरपे यांनी ‘माउंट मेरा’ या नेपाळमधील सहा हजार ४७६ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यांनी ही चढाई एकट्याने (सोलो) केली. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास झिरपे ‘माउंट मेरा’ शिखरावर पोहोचले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language